भाजपचे निष्ठावंत सुशिल (राजा) गावडे

तिरवडे गावचा बुलंद आवाज, निष्ठावंत ‘आपला नेता’- सुशिल (राजा) गावडे.वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

गेली कित्येक वर्षे तिरवडे गावासह आसपास च्या गावातील गोरगरीब लोकांच्या हितासाठी राजकारणातुन समाज सेवा देणारे,राजकारण हा व्यवसाय न मानता सर्वसामान्यांचा आधारवड बनुन ‘देवदुत’ म्हणून सुशिल उर्फ राजा गावडे यांना ओळख मिळाली आहे. महाराष्ट्रातील राजकारण ‘एका बाजुला’ आणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण ‘दुसऱ्या बाजुला’. आणी याच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या केंद्रबिंदू असलेल्या मालवण तालुक्यातील तिरवडे गावात आपल्या समाजसेवच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे नेतृत्व म्हणजे सुशिल गावडे.

राजकारण म्हणजे केवळ पद नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याची अखंड धडपड. तिरवडे ग्रामपंचायत उपसरपंच सुशिल गावडे यांनी आपल्या कार्यातून हीच ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी लोकसेवेच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून त्यांनी गावातील विकासकामांना प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. जेष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणे आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी अहोरात्र धावपळ करणे, ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये ठरली आहेत.

तिरवडे गावात स्ट्रीट लाईटचे जाळे उभारण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार गावाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. सुरक्षित, उज्ज्वल आणि आधुनिक गावाच्या दिशेने त्यांनी केलेले हे काम ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे.

सुशिल गावडे हे भाजपचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते समजले जातात म्हणूनच त्यांना सुकळवाड पंचायत समिती मध्ये उमेदवारीची संधी होती मात्र तिरवडे गावच्या विकासाला जास्त वेळ देता यावा यासाठी त्यांनी ती संधी नाकारली होती. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत विकासाची वाटचाल त्यांनी अधिक वेगाने सुरू ठेवली आहे. त्यामुळेच आज ते केवळ लोकप्रतिनिधी नसून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

गावातील पायाभूत सुविधा, शासकीय योजनांचा लाभ, युवकांचे प्रश्न, महिलांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचे भविष्य या प्रत्येक विषयावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या योजना पोहोचाव्यात, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, ही त्यांची कार्यपद्धती ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

त्यांच्या लोकाभिमुख कार्यामुळे तिरवडे गावामध्ये नव्या पिढीच्या नेतृत्वाचा एक आशादायी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. जनसंपर्क, विकासाची दृष्टी, समाजाशी असलेली नाळ आणि सातत्याने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे “तिरवडे गावचा उभरता कोहिनूर” अशी त्यांची ओळख अधिक बळकट होत आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांनी हाती घेतलेली लोकसेवेची वाटचाल अशीच अधिक व्यापक होत राहो,तिरवडे गावच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अधिकाधिक वाढत राहो आणि जनतेचा विश्वास त्यांना कायम लाभत राहो, हीच सदिच्छा.

error: Content is protected !!