मालवण : आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. नकळत या सर्वांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेट हाताळताना आपण खूप काळजी घेणं गरजेचे आहे.
वर्तमानात आणि भविष्यात या सायबर धोक्यांपासून आपला स्वतःचा बचाव कसा करावा यासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या वतीने मंगळवार दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हा कार्यक्रम सकाळी ९:३० ते सायंकाळी ४:३० पर्यंत तीन सत्रांमध्ये होणार आहे.
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील प्रसिद्ध व्याख्याते श्री मंदार वैद्य यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. श्री मंदार वैद्य हे गेले अनेक वर्ष पुरातन ओरिगामी कला जपत आहेत. त्याचबरोबर रक्तदान शिबिर , मन:शांती, व सायबर भान सारख्या कार्यक्रमातून विविध सामाजिक संदेशही देत आहेत.
परिसरातील विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मोबाईल व इंटरनेट मुळे भविष्यात उद्भवणाऱ्या धोक्यांपासून सावध व्हावे असे आवाहन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.