तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्यांना आग

मालवण : तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्याना सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीत होड्या ठेवण्याच्या मंगरीसहित होड्या जळून खाक झाल्या. पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकास आग लागल्याचे लक्षात येताच त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते केले होते मात्र आगीचा भडका जास्त असल्याने काही क्षणातच होडी ठेवण्याच्या मांगरीसहित होड्या जळून खाक झाल्या. अगीचे कारण समजू शकले नाही आग लागल्याचे समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.

या आगीत रापणीच्या होड्या जळून खाक झाल्या असून सुमारे 40 मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह हिरावला गेला आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत होड्या, इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रापणी मासेमारीवर अवलंबून असलेल्या मच्छीमार कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आगामी मासेमारी हंगामावरही याचा गंभीर परिणाम होणार आहे. या आगीत होडी ठेवण्याच्या मांगरीत दोन होड्या, फायबरची पात, 200 किलो वाजणाचे नायलॉन रोप, होड्या ओढताना वापरल्या जाणाऱ्या पाच उंडली असे एकूण सामान होड्या ठेवण्याच्या मांगरीत होते हे सर्व सामान जळून खाक झाले. यात दोन होड्या, एक फायबर पात, रोप, उंडली असे मिळून 10 लाखाचे सामान, तसेच मांगरीचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले

सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तळाशील रस्त्यालगत असलेल्या होड्या ठेवण्याच्या मांगरिकडे धूर दिसून अगीच्या ज्वाळा रस्त्यावरून जाणाऱ्या पर्यटकास दिसल्या त्याने तातडीने ग्रामस्थ यांच्या निदर्शनास आणली. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी धाव घेत लागलीच आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र किनाऱ्यावरून वाऱ्याचा जोर असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते. आग विजवण्यासाठी भाई आडकर, महेश मालंडकर, स्वप्नील तारी, विनायक कोचरेकर तसेच तळाशील ग्रामस्थांनी आग विजवण्याचे काम हाती घेतले होते घटना समजताच माजी सरपंच संजय केळूसकर, जयहरी कोचरेकर, संजय तारी, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामसेवक युती चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र मेस्त, भुपाल मालंडकर, पोलिस पाटील जगदीश मुळे घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीत जळून खाक झालेल्या पारंपरिक रापणीच्या होड्यांवरच परिसरातील सुमारे 40 मच्छीमार कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह अवलंबून होता. रापणी मासेमारी हे या कुटुंबांचे एकमेव उत्पन्नाचे साधन असून होड्या व इतर साधने नष्ट झाल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक कुटुंबांमध्ये वृद्ध, महिला व शिक्षण घेत असलेली मुले असून आता त्यांच्या दैनंदिन खर्चासह शिक्षण व कर्जफेडीचा भार कसा पेलायचा, असा प्रश्न निर्माण झालाआहे. शासनाने तातडीने मदत न केल्यास या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. आगीत जळालेल्या होड्यांपैकी दोन होड्या नुकत्याच नव्याने तयार करण्यात आल्या होत्या. या होड्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. त्या पूर्णपणे जळून खाक झाल्याने नुकसानाचे प्रमाण वाढले असून पारंपरिक रापण संघाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवीन होड्या तयार करण्यासाठी संघातील सदस्यांनी आर्थिक ओढाताण करून बनवल्या होत्या. मात्र उत्पन्न मिळण्या अगोदरच आगीत नष्ट झाल्याने रापण संघासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

error: Content is protected !!