मोठी बातमी…पालघर मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावावर प्राणघातक हल्ला

मोरे कुटुंबाचा अविनाश जाधव यांच्यावर आरोप

पालघर प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकित पराभूत झालेले मनसे चे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा घेतला याला अवघे काही तास झाले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे.पालघरचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचा भाऊ अतिश मोरे याच्यावर कोयते, तलवार, चाकू अशा धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अतिश मोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या बोईसरच्या शगुन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

काय आहे सविस्तर वृत्तांत?

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बोईसरमधील मनसेच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला. समीर मोरे, अतिश मोरे काही जणांसह कार्यालयाच्या बाहेर बसले होते. याचवेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतिश मोरे गंभीर जखमी झाले आहेत. समीर मोरे यांनाही यावेळी मारहाण झाली आहे. अतिश मोरे यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. दरम्यान हल्ला केल्यानंतर सर्वजण गाडीतून पसार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या हाती कोणी लागलेलं नाही. दरम्यान मोरे कुटुंबाने अविनाश जाधव यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *