माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य शिबिर

मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत भगवती हॉल येथे आयोजन

आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आयोजकांनी केले आवाहन

कणकवली : मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण व माजी आमदार यांच्या सहकार्याने मा. श्री. परशुरामजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत भगवती हॉल, नेहरूनगर, ता. कणकवली येथे होणार आहे.

या शिबिरामध्ये विविध गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया शासकीय योजनांद्वारे मोफत करण्यात येणार आहेत. त्यामध्ये अँजिओप्लास्टी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी व मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

तसेच काही शस्त्रक्रिया अल्पदरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये हर्निया, महिलांचे गर्भाशयाचे आजार, थायरॉईड शस्त्रक्रिया, मणक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अॅपेंडिक्स, मुळव्याध, स्तनांमधील गाठी, हायड्रोसेल व इम्प्लांट रिमूवल यांचा समावेश आहे.

शिबिरात जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ आणि नेत्ररोग तज्ञ यांच्या मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!