सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार जनता दरबार
विविध खात्याचे अधिकारी राहणार उपस्थित
जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत जनतादरबार घेण्याच्या सूचना
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी कणकवली पंचायत समितीतर्फे १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार कणकवली पंचायत समितीच्या भालचंद्र महाराज सभागृहात सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार होणार आहे. यावेळी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रमुख खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात आरोग्य विभाग, एस.टी. महामंडळ, महावितरण , सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग या प्रमुख विभागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अन्य संबंधित विभागांच्या समस्या स्वीकारल्या जाणार आहेत. संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता येणार आहेत.नागरिकांनी आपल्या विविध समस्या व तक्रारी घेऊन या जनता दरबारास उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांनी केले आहे.


Subscribe









