
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा बैठक कणकवली येथे संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश संघटक विजय कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा अध्यक्ष मुख्य आघाडी विजय खरात, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी संतोष साळसकर, यांसहित जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व बैठकीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्यात आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेर निवड झाल्याबद्दल व महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन ठराव घेण्यात आला व सभेला सुरुवात करण्यात आली. संघटनेचे ध्येय धोरण संघटनेचे काम व संघटनेची बांधणी कशा प्रकारची करावी याबाबत कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी सभागृहात मार्गदर्शन केले. ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही एक संघटना नसून एक विचार आहे तळागाळातील समाज बांधवांना न्याय देण्यासाठी काम करणारी सेवाभावी एक संस्था आहे हे आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे. जेवढ्या ताकतीने आपला महासंघ आपण मजबूत करू तेवढ्याच ताकदीने आपण समाजाचे प्रश्न तातडीने सोडवू शकतो त्यामुळे सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी केले. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी व मुख्य आघाडी संघटनात्मक बांधणी करत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण जी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही जिल्हाध्यक्ष यांनी बैठकीत अधिकृत घोषणा केली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण सभेचे कामकाज मुख्य आघाडी अध्यक्ष जिल्हा सिंधुदुर्ग विजय खरात, युवा अध्यक्ष संतोष साळसकर यांनी केले. अध्यक्ष भाषणामध्ये विजय कोकरे यांनी संघटनेच्या कामाला महत्त्व देऊन सर्वांनी एकत्रित काम करावे येणाऱ्या काळात काय समाजाला नवीन आदर्श निर्माण करून देणारी संघटना म्हणून ऑल इंडिया धनगर समाज महासंघ नावारूपाला यावा अशा प्रकारचे काम सर्वांनी करा असे प्रतिपादन कोकरे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या बैठकीत ठरलेले विषय खालील प्रमाणे
१) पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचा जिल्हा ओरस मुख्यालय येथे भव्य पुतळा उभारण्यात यावा याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार.
२) दळणवळणाच्या सुविधेसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधणार.. दळणवळणाच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास रस्त्यावरची लढाई लढण्यास महासंघ तयार
३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाजातील विद्यार्थी
आभार प्रदर्शन राजेंद्र माने यांनी केले. या बैठकीला प्रदेश संघटक विजय कोकरे कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हाध्यक्ष मुख्य आघाडी विजय खरात जिल्हाध्यक्ष युवक संतोष साळसकर, अंकुश जंगले, राजेंद्र माने, एडवोकेट विक्रमसिंह काळे, धुळू कोळेकर, राया काळे, प्रकाश कोकरे, संदीप बोडेकर, संतोष जंगले, राहू खरात, तुषार शिंगाडे, अथर्व जंगले,गंगाराम शिंदे, राजेश गावडे किशोर काळे अंकित शेळके, गणेश खरात व इतर समाज बांधव पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी कार्यकारणी खालील प्रमाणे.
1) अध्यक्ष – संतोष गंगाराम साळसकर (देवगड)
2) उपाध्यक्ष दिपक खरात (कुडाळ)
3) उपाध्यक्ष जानू पाटील (दोडामार्ग)
4) सरचिटणीस बाजीराव शंकर काळे (मालवण)
5)संघटक सरचिटणीस भरत गोरे (सावंतवाडी )
6)चिटणीस – राहू खरात (वेंगुर्ले)
7) खजिनदार राजेंद्र गंगाराम माने (कणकवली) 8)उप खजिनदार – शाहू खरात(देवगड) 9) हिशोब तपासनीस(लेखापरीक्षक) – रमेश खरात (कुडाळ) 10) कार्याध्यक्ष -लखू खरवत(दोडामार्ग) 11) संपर्क प्रमुख प्रकाश बाबू शिंदे काम(कणकवली)
12) संघटन मंत्री – सुशील खरात (मालवण)
13) मिडिया प्रमुख – विजय जंगले (सावंतवाडी)
14) प्रसिद्धी प्रमुख तुषार राजाराम शिंगाडे (वैभववाडी)
15) कायदेशीर सल्लागार ॲड विक्रमसिंह काळे (वैभववाडी)
16) प्रमुख सल्लागार चंद्रकांत म्हाळू बोडेकर (वैभववाडी
17) सल्लागार – रामचंद्र काळे (कणकवली)
18) सल्लागार – महेश जंगले(देवगड )
19) सल्लागार – नितीन गावडे (कुडाळ)
जिल्हा कार्यकारणी (मुख्य आघाडी) खालील प्रमाणे
1) अध्यक्ष – विजय खरात (मालवण)
2) उपाध्यक्ष नागेश बोडेकर (कणकवली)
3) उपाध्यक्ष – धुळाजी आप्पाजी काळे (वैभववाडी)
4) उपाध्यक्ष – अंकुश सोनू जंगले(मालवण)
5)सरचिटणीस – सुरेश अनंत बोडके (वैभववाडी)
6) खजिनदार – संदीप गंगाराम बोडेकर
7) कार्याध्यक्ष – संतोष इंजू जंगले (देवगड)
8) संघटन मंत्री – प्रकाश कोकरे (देवगड)
9) मिडिया प्रमुख – बिरू भागोजी वरक (कुडाळ)
10) प्रमुख सल्लागार – राजाराम विठोबा बोडके (सावंतवाडी)
11) सल्लागार – गंगाराम इंजू शिंदे(वैभववाडी)
12) सल्लागार- सखाराम राम जंगले (दोडामार्ग)
13) संपर्क प्रमुख – सुरेश विठ्ठल जंगले


Subscribe










