मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील पिटढवळ नदीजवळ अपघात

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील पिटढवळ नदीजवळ आज दुपारी १:१० सुमारास एक भीषण अपघात घडला. केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका टाटा ट्रॅक वाहनाला हा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, KL 14 AF 5193 या क्रमांकाचे वाहन केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. पिटढवळ नदीच्या पुलाजवळ आले असता, चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगवर जोरात आदळले. रेलिंगमध्ये वाहन अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनाचे नुकसान झाले असले तरी, त्यातील वाहक सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधले जात आहे.

error: Content is protected !!