नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण
कुडाळ शहराच्या सौंदर्यात भर
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायत वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संत राऊळ महाराज महाविद्यालय समोरील एस. एन. देसाई चौक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा कारंजा उभारण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या फंडातून हे डॉल्फिन फाउंटन उभारण्यात आले. या डॉल्फिन फाउंटनचे लोकार्पण नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती मिलिंद नाईक, नगरसेवक विलास कुडाळकर, अभिषेक गावडे, अॅड. राजीव कुडाळकर, मंदार शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली व विनायक राणे, माजी सभापती तथा भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य दीपक नारकर, रूपेश कानडे, नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेविका नयना मांजरेकर, गजानन कांदळगावकर, अभिषेक माने, संजय भोगटे, पप्या तवटे, चेतन पडते, चंदन कांबळी, स्वरूप वाळके यांच्यासह न.पं.चे अधिकारी, कर्मचारी व शहरवासिय नागरिक उपस्थित होते.


Subscribe









