कुडाळ रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, सेक्रेटरी राकेश म्हाडदळकर, खजिनदार डॉ.जयश्री केसरे यांनी दिमाखदार सोहळ्यात आज केले पदग्रहण.

रोटरी क्लब आऑफ कुडाळे कार्य आदर्शवत – पदग्रहण अधिकारी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नाॅमिनी इलेक्ट डाॅ सुहास जोशी

कुडाळ : दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो आजच्या दिवशी कुडाळ रोटरी क्लबच्या नवीन टीमने अध्यक्ष रो मकरंद नाईक सेक्रेटरी रो राकेश म्हाडदळकर खजिनदार म्हणून रो डॉ. जयश्री केसरे तसेच कुडाळ क्लबच्या संचालक मंडळातील विविध पदाधिकाऱ्यांनी आज पदग्रहण केले हा पदग्रहणाचा दिमाख दार कार्यक्रम आज १जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे पदग्रहण अधिकारी रो.डॉ. सुहास जोशी सांगली यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर पदग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रो. संजय रावराणे हे देखील उपस्थित होते तसेच व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो .प्रणय तेली असिस्टंट गव्हर्नर रो. अभिषेक माने तसेच जिल्ह्याभरातून आलेल्या सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी सदस्य पत्रकार उपस्थित होते खास करून कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री मिलिंद नाईक देखील या सोहळ्यास उपस्थित होते अतिशय दिमाखदार पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला मावळते अध्यक्ष रो. राजीव पवार यांनी आपण वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच नवीन अध्यक्ष रो मकरंद नाईक यांनी आपण पुढील वर्षभरात विविध उपक्रम राबविणार आणि कुडाळ रोटरी क्लबचे नाव अजून मोठ करणार याची ग्वाही दिली तसेच रोटरी अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कुडाळ क्लबच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.

आज दिवसभरात कुडाळ रोटरी क्लबने विविध उपक्रम राबवले. त्यात प्रामुख्याने कुडाळ क्लबच्या वतीने वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच डॉक्टर्स डे च्या निमित्ताने विविध डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला यात प्रामुख्याने डॉक्टर जीटी राणे डॉक्टर संजय केसरे डॉक्टर जयश्री केसरे डॉक्टर रवींद्र जोशी डॉक्टर संजय सावंत डॉक्टर शिल्पा पवार डॉक्टर सायली प्रभू तसेच इतरही डॉक्टरांचा सहभाग होता तसेच चार्टर्ड अकाउंटंट डे च्या निमित्ताने सीए गजानन प्रभू ,श्री सुनील सौदागर, सीए सागर तेली, सीए शैलेश मुंडे अशा विविध चार्टर्ड अकाउंटंट लोकांचा देखील सत्कार करण्यात आला.

आजच्या पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून च्या वतीने घावनळे कुटुळवाडी येथील श्री कृष्णा विले यांना रोटरी व्होकेशनल अवार्ड देण्यात आला. तसेच श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूळच्या मुख्याध्यापिका सौ सुनीती नाईक मॅडम यांना कुडाळ रोटरी क्लबच्या वतीने ज्ञानज्योती अवार्ड देण्यात आला,
तसेच या कार्यक्रमांमध्ये कुडाळ क्लबच्या वतीने ओरोस येतील डॉन बॉस्को शाळेसाठी दोन प्रिंटर भेट देण्यात आले,
तसेच श्री लिंगेश्वर विद्यालय तुळसुली या शाळेमध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या सोनिया आनंद झोरे या मुलीला पुढील शिक्षणासाठी रोख रुपये 5000 ची आर्थिक मदत करण्यात आली. पावशी येथे राहणारे डॉक्टर बापू भोगटे यांना रोटरी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुडाळ वासियांच्या सेवेत स्वखर्चाने वैकुंठ रथ समर्पित करणारे माजी नगराध्यक्ष रो ओंकार तेली यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!