सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण
शेतकऱ्यांनी ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण ५ हजार ११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ८ कर्जखाती पात्र ठरली असून, आतापर्यंत ३ हजार ९५६ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती ही माहिती सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी दिली.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आली. या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीयीकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांमधील कर्जखात्यांची माहिती संबंधित बँकांच्या प्रधान कार्यालयांकडून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहे.
बँकांकडून माहिती अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय प्रणालीद्वारे सर्व माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या कर्जदारांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. या याद्या निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच स्थानिक स्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सेवा सुविधा केंद्रामार्फत ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच योजनेअंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी संबंधित सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe









