कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहानिमित्त श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने दि. १९ ते २५ जुलै या कालावधीत संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे.
या सप्ताहादरम्यान दि. २३ जुलै रोजी चक्री वारकरी भजन स्पर्धा, तर दि. २४ जुलै रोजी वारकरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि. २० ते २५ जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी ५ वाजता देवगड येथील दिंडी वारकरी भजनाचे सादरीकरण होणार आहे.

हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने संगीत भजन, चक्री वारकरी भजन व वारकरी भजन स्पर्धांद्वारे हरिनामाचा जागर केला जातो. या स्पर्धांमध्ये नामवंत भजन मंडळांचा सहभाग असतो. त्यामुळे भजनप्रेमी व रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.
संगीत भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ११,१११ रुपये, द्वितीय ७,७७७ रुपये, तृतीय ५,५५५ रुपये, चतुर्थ ३,३३३ रुपये, पाचवा २,२२२ रुपये तसेच दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी १,५०१ रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उत्कृष्ट हार्मोनियम, तबला, पखवाज, गायक, कोरस व तालरक्षक यांना प्रत्येकी १,००१ रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सुमेध साळवी (९४०५३९९७७४) व भूषण मठकर (८८८८५५३१७७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. २३ जुलै रोजी होणाऱ्या चक्री वारकरी भजन स्पर्धा व दि. २४ जुलै रोजी होणाऱ्या वारकरी भजन स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ११,००१ रुपये, द्वितीय ७,००१ रुपये, तृतीय ५,००१ रुपये, उत्तेजनार्थ ३,००१ रुपये व प्रत्येकी चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धांसाठी भूषण मठकर (८८८८५५३१७७) यांच्याशी संपर्क साधावा.

दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत चित्ररथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता काल्याने सप्ताहाची सांगता होणार असून, दि. २७ जुलै रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी आणि भजन रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव मारुती नगर ब्राह्मण देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे

error: Content is protected !!