कुडाळ : दिनांक १ जुलै रोजी वालावल गावात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम च्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.
तसेच जि. प. प्राथमिक शाळा, वालावल बाजारपेठ येथील विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवून वृक्ष दिंडी काढली.
या कृषीदिनामध्ये मयुरेश दळवी (आंब्रड), अजित म्हसकर (रानबांबुळी), स्मित कोळेकर (चिपळूण), मनीष कमेरिया ( राजस्थान), सोनू कुमार ( बिहार) आणि उज्वल तोंडवळकर (तोंडवळी) यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी सरपंच राजेश प्रभू , उपसरपंच कवठणकर तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षिका कविटकर मॅडम आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात शेतकरी, विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला . विविध कृषी विषयांवर चर्चा झाली .
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Subscribe










