मग आता मंदार शिरसाट या प्रकल्पाला विरोध का करत आहेत?
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांचा थेट सवाल
“ज्या प्रकल्पाला आज नगरसेवक मंदार शिरसाट विरोध करत आहेत, तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात म्हणजेच २०२२ मध्ये मंजूर झाला होता. मग आता ते विरोध का करत आहेत?” असा थेट सवाल कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी केला.
आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना डेमो (प्रात्यक्षिक) दाखवण्याचे आश्वासन दिले होते. यावर स्पष्टीकरण देताना नगराध्यक्षा बांदेकर यांनी सांगितले की, “आमदार साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे, त्याच दिवशी नगरपंचायत कर्मचारी आणि मी स्वतः एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत थांबून ग्रामस्थांची वाट पाहिली होती. मात्र, संध्याकाळी ग्रामस्थ आलेच नाहीत.”
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी ग्रामस्थांना आणि प्रकल्प विरोधकांना आवाहन केले आहे.
- “या प्रकल्पाबाबत कोणतीही शंका मनात ठेवू नका.”
- “या प्रकल्पाचा उद्देश चांगला आहे. त्याची माहिती घ्या आणि मगच विरोध करा.”
- “या प्रकल्पातून कचरा विघटन होऊन शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.”
- “यापुढेदेखील नागरिक जेव्हा म्हणतील, तेव्हा आम्ही या प्रकल्पाचा डेमो दाखवण्यासाठी तयार आहोत.”
- “कोणीही मनात शंका न ठेवता, प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घ्यावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे.
हा गंभीर वाद कधी मिटणार, नगरपंचायत प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा होऊन यावर काय तोडगा निघणार, याकडे आता कुडाळवासीयांचे लक्ष लागले आहे.



Subscribe









