डॉ. अरुण गोडकर यांना राज्यस्तरीय ‘धन्वंतरी गौरव पुरस्कार’ प्रदान

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील प्रतिथयश डॉ. अरुण गोडकर यांना कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘धन्वंतरी गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.

डॉ. अरुण गोडकर गेल्या अनेक वर्षांपासून पणदूर पंचक्रोशीतील नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. आजवर ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता त्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे. पूर्वीच्या काळी प्रवासाची साधने नसताना गुडघाभर चिखलातून वाट काढत त्यांनी आपले रुग्णसेवेचे कर्तव्य बजावले आहे. आजवर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता त्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे. म्हणूनच पणदूर पंचक्रोशीत गरिबांचा डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी आजवर रुग्णांना दिलेली सेवा पाहता रुग्णसेवेच्या क्षितिजावरील अरुणोदय असे म्हणायला हरकत नाही.

आजवर त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेत त्यांना अविष्कार फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय धन्वंतरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

error: Content is protected !!