
अंगणवाडी ते महाविद्यालयी 10 आदर्श व्यक्तिमत्वाचा केला सन्मान
शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान -काशिनाथ सामंत सर
कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळकडून शिक्षक दिनाच्या औचित्य साधून कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation Builder Award” देऊन गौरव करण्यात आले.हा पुरस्कार वितरण सोहळा संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे संपन्न झाला.यावेळी शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान काशिनाथ सामंत सरांनी गौरोद्गार काढले.
यावेळी कुडाळ हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ सामंत सर,संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ स्मिता सुरवसे ,कुडाळ रोटरी क्लब अध्यक्ष मकरंद नाईक ,सचिव राकेश म्हाडदळकर,इव्हेंट चेअरमन सचिन मदने,माजी असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर,रविंद्र परब ,डाॅ संजय केसरे आदी उपस्थित होते
रोटरी नेशन बिल्डर पुरस्काराचे मानकरी,-
सौ. नयना सावंत,अंगणवाडीसेविका (घावनळे खुटवळवाडी),
सौ. रुपाली चव्हाण अंगणवाडीसेविका ,( मुळदे )
श्री. लक्ष्मण आगलावे प्राथमिक शिक्षक( कुडाळ पडतेवाडी शाळा ), श्री. अमोल गोसावी,प्राथमिक शिक्षक (नेरूर गोवेरी.),
श्री. रुपेश कर्पे सहाय्यक शिक्षक (पणदूर हायस्कूल ) श्री. विद्यानंद पिळणकर,सहाय्यक शिक्षक (साळगाव हायस्कूल ),सौ. सलोनी सावंत,उच्च माध्यमिक विभाग ( पणदूर हायस्कूल ), श्री. अजित व्हनमाने सर ,उच्च माध्यमिक विभाग (कुडाळ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज), सौ. देवयानी आंगचेकर मॅडम,सहाय्यक प्राध्यापक(संत राऊळ महाराज महाविद्यालय),श्री. एस. के. पवार सर,सहाय्यक प्राध्यापक,(संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ) या आदर्श व्यक्तिमत्वाला सन्मानपत्र ,शाल ,श्रीफळ ,फुल देवून गौरविण्यात आले.
रोटरी अध्यक्ष मकरंद नाईक –
शिक्षक फक्त शिकवत नाहीत, ते पिढ्या घडवतात; स्वप्नांना दिशा देतात आणि राष्ट्राच्या भविष्याची पायाभरणी करतात.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इव्हेंट चेअरमन श्री सचिन मदने सर यांनी केले तर आभार सचिव राकेश म्हाडदळकर यांनी व्यक्त केले.



Subscribe









