सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडी तर्फे जिव्हाळा सेवाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
:
श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सेवाश्रमातील लाभार्थ्यांना मंडळाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देत मानवतेचे उदाहरण मंडळाने घालून दिले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री कृष्णा लाखे,सचिव श्री नितेश पाटील, खजिनदार श्री अंकुश लाखे, कार्याध्यक्ष श्री रोहित लाखे , गणेश खोरागडे ,लखन पाटील, सुनील पाटील, रोहन पाटील, धिरज लाखे, साई लाखे, पवन पाटील, रामा लाखे तसेच जिव्हाळा सेवाश्रमाच्या संचालिका कु. गितांजली बिर्जे उपस्थित होत्या. जिव्हाळा सेवाश्रमाचे इतर सदस्यही या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत असून, रासाई युवा कला क्रीडा मंडळाचे हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

error: Content is protected !!