नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात! रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला आज शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नेरूर पंचक्रोशी मर्यादित परिसरात पार पडलेल्या या भव्य बैल सजावट स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक रूपेश पावसकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत पंचक्रोशीतील तब्बल 21 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. पारंपारिक वेशभूषेत सजवलेले बैल, रंगीबेरंगी फुलांच्या माळा आणि गावकऱ्यांचा उत्साह… या सगळ्याने आजचा चव्हाटा परिसर अक्षरशः फुलून गेला.

“शेतकरी वर्गासाठी मी कायम झटत राहणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. माझ्या शेतकरी बांधवांचे प्रश्न शासन दरबारी ठामपणे मांडणार. शेतकरी जगला पाहिजे तरच सर्व शक्य आहे,” असं उद्योजक रूपेश पावसकर यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितलं.कोकणातील पारंपरिकता आणि संस्कृती आजही जपली जातेय, हे या स्पर्धेतून स्पष्ट झालं. शेतकऱ्यांचा उत्साह पाहून रूपेश पावसकर यांनी समाधान व्यक्त केलं आणि “तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, शेतकऱ्यांसाठी जेवढं शक्य आहे तेवढं मी करेन,” असं आश्वासनही दिलं.बैल सजावट स्पर्धेत गावोगावीचे शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रेक्षकांनीही मोठ्या उत्साहाने या पारंपरिक सोहळ्याचा आनंद लुटला.नेरूर चव्हाटा परिसरात आजचा दिवस खऱ्या अर्थाने शेतकरी सन्मान दिन ठरला.शेतकरी, परंपरा आणि कोकणी संस्कृती यांचा संगम म्हणजेच नेरूर पंचक्रोशीत आयोजित ही बैल सजावट स्पर्धा ठरली.

या स्पर्धेत सहभागी बैल मालक श्री.प्रकाश साऊळ, श्री.आजीम मुजावर श्री.मारुती नारिंग्रेकर,श्री.विशाल नाईक,श्री.बाळा रेवंडकर,श्री.आनंद लिंगे,श्री.नारायण गोविंद भगत,श्री.शशिकांत रामचंद्र गावडे,श्री.स्वप्निल नेरुरकर,श्री.बाळा नांदोसकर,श्री.बाबी साऊळ,श्री.प्रकाश तेली,श्री.काका खोत,श्री.प्रकाश सावकर,श्री.मोहन जोशी,श्री.संदीप वारंग,श्री.प्रथमेश घाडी,श्री.रुपेश पावसकर,श्री.सुशांत नाईक, श्री.भुवनेश गवंडे,श्री.देसाई,श्री.दाजी गावडे,श्री.आनंद नेरुरकर आदी बैल मालक सहभागी झाले होते.ही स्पर्धा श्री देव कलेश्वर मंदिर नेरूर ते नेरूर चव्हाटा हनुमान मंदिर अशी बैल सजावट स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत सर्व बैल मालक व बैल पाड्यांच्या माध्यमातून श्री देव कलेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.तद्नंतर हनुमान मंदिर चव्हाटा येथे रवाना झाली.यावेळी व्यासपीठावर उपस्थित श्री रुपेश पावसकर,ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दाजी गावडे ,श्री बाळा घाडी,श्री.अशोक पावसकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.शंभूराज उर्फ समीर नाईक, श्री प्रवीण नेरूरकर,श्री.पियो खतीप, मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते श्री.सुधीर नेरूरकर, श्री.कल्पेश मार्गी,श्री.आनंद नेरुरकर,श्री.नरेश नेरुरकर, श्री.अमरजित कदम,श्री.प्रभात वालावलकर,श्री.कृष्णा उर्फ गोट्या पाटकर,श्री.संतोष परब,श्री.सतीश सावंत,श्री.अमोल श्रृंगारे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!