माड्याची वाडी येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांची शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी घेतली भेट

कुडाळ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी माड्याची वाडी (रायवाडी) येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांच्या घरी भेट देऊन त्याची विचारपूस केली. तसेच त्याला धीर दिला. यावेळी तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख माजी सरपंच श्री सचिन गावडे उपस्थित होते. यावेळी सिद्धेश गावडे यांचे वडील श्री प्रमोद गावडे, आई, बहीण ,भावोजी, उपस्थित होते. त्यांनी झालेल्या हल्ल्या संबंधी बरीचशी माहिती कथन केली. योग्य तपास करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू असे म्हणत वर्षाताई कुडाळकर यांनी कुटुंबाला धीर दिला.

error: Content is protected !!