पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात विनायक राणे नावाचा बोलबाला

सर्वसामान्य जनतेचा वि’नायक’ – विनायक राणे

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांची उत्सुकता शांत झाली. या आरक्षणामुळे काही ठिकाणी दिग्गजांचे पत्ते कट झाले. तर काही जण पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. कुडाळ तालुक्यातील काही महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे पिंगुळी मतदारसंघ… या मतदारसंघातूनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. यातीलच एक नाव म्हणजे विनायक राणे यांचं…

विनायक राणे हे शिवसेनेचे विद्यमान कुडाळ तालुकाप्रमुख असून कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. कुडाळ नगरपंचायतचे पहिले नगराध्यक्ष अशी त्यांचे ओळख आहे. कुडाळ नगराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली असून या कालावधीत कुडाळ शहरात त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. समाजकारण व राजकारण यांच्या प्रदीर्घ अनुभव त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची गाठीशी आहे. तळागाळातील जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. एकंदरीत सावसामान्य जनता त्यांना आपल्या आयुष्यातील वि’नायक’ समजते.

एकंदरीत मांडकुली, तुळसुली, करवडे, साळगाव,मुळदे पिंगुळी या गावांमध्ये विनायक राणे यांचे नाव चर्चेत आहे. सर्वांच्या मुखातून विनायक राणे हेच नाव ऐकू असून “विनायक आमच्या हक्काचो आसा तेका आम्ही गरजेक कधीपण हाक मारू शकतव” अशा प्रकारचे स्वर सर्वसामान्य जनतेमधून उमटू लागले आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत त्यांचा चांगला संपर्क आहे. वरिष्ठ नेते आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून ते सध्या काम करत आहेत. सर्वसामान्यांच्या हाकेला धाऊन जाणे, जनसेवेची असलेली तळमळ, नेतृत्वक्षमता, वरिष्ठ नेत्यांशी असलेला संपर्क, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव इत्यादींचा विचार करता पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातून ते शिवसेनेचे एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत…

error: Content is protected !!