श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत स्वदेशी तत्त्वाची जोपासना

संतोष हिवाळेकर / पोईप

स्वदेशी वस्तूंचा वापर म्हणजे आपल्या स्थानिक उत्पादन उद्योगांना प्रोत्साहन देणे.दिवाळीच्या सणाला आपण बाजारातून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो स्थानिक उत्पादन उद्योगाला महत्त्व न देता आपण मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करत असतो. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना त्याचा फायदा न होता तोटा सहन करावा लागतो. पण आपण केलेल्या वस्तूंमध्ये आपली संस्कृती दडलेली असते आणि हाच विचार त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी प्रशालेत ‘पणती रंगविणे’कार्यशाळा तसेच ‘आकाश कंदील’ बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. पणत्या रंगविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मातीच्या पणत्यांना स्वतःच्या हाताने रंग दिले व दिवाळीनिमित्त बाजारातून विकत आणून भेटवस्तू न देता आपल्या गुरुजनांना,मित्रांना आपण रंगविलेल्या पणत्या भेट म्हणून दिल्या.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक कागदापासून आकाश कंदील बनविले. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये आपली संस्कृती तर जोपासली गेलीच पण यातून देखील आपल्याला रोजगार प्राप्त होऊ शकतो हे समजले.
या कार्यशाळेसाठी प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा केळूसकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सृजनशीलतेचे व नाविन्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे स्वदेशी वस्तूचा वापर करत आपण आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करूया. असे सांगत विद्यार्थ्यांना स्वदेशीचे महत्व समजावून सांगितले. या कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षिका वेदिका दळवी, महेश गावडे,MSFC निदेशक हर्षदा पाटकर, कुणाल आंगणे, रोशन माळकर, केशव भोगले, हे उपस्थित होते.

error: Content is protected !!