आ. निलेश राणे पुरस्कृत व शिवसेना कुडाळ शहर आयोजित जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा २०२५

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत व शिवसेना कुडाळ शहर आयोजित जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी चौक, कुडाळ येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला ₹३३३३३/- व चषक, उपविजेत्या स्पर्धकाला ₹२२२२२ /- व चषक आणि तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकाला ₹१११११/- व चषक दिले जाणार आहे. तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी ₹५५५५/- व चषक दिले जाणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रात्रौ. ९.३० वाजता आ. निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

चेतन पडते – ७२१८२४२९९९
आबा धडाम – ९४०४१६६८६८

error: Content is protected !!