माजी खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज राणेंची कणकवलीत भेट घेतल्यानंतर लवकरच दत्ता सामंत कुडाळ , मालवण मध्ये निलेश राणे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता सामंत हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असून त्यांना जिल्हाप्रमुख या पदाची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दत्ता सामत लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून जिल्हाप्रमुख पदी निवड झाल्यानंतर कुडाळ – मालवण मतदार संघामध्ये प्रवेशांचा धडाका लावणार असल्याची सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे.