दोडामार्ग प्रतिनिधी: दिल्ली, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देवून रविवारी गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांना त्यांनी सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला होता.
सदर पुरस्कार वितरण सोहळा आज 27 ऑक्टोंबर रोजी बेळगाव या ठिकाणी पार पडला. या पुरस्कारामध्ये राष्ट्रीय पुरस्कार, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र, चंदनाचा कायमस्वरूपी हार अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा रविवारी पार पडला. दोडामार्ग येथील सोनू गवस देखील उपस्थित होते.