कुडाळ : शिवसेना शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून कुडाळ सिंधुदुर्ग मैदान येथे शिवउद्योग जिल्हाप्रमुख श्री विश्वास गावकर, उपजिल्हा रचना नेरुरकर यांच्या संकल्पनेतून लागलेल्या बचतगटाच्या स्टॉल ना ओबीसी व्हिजेएनटी शिवसेना च्या पदाधिकारी यांनी भेट दिली .यावेळी ओबीसी व्हिजेएनटी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.श्री .श्रीधर पेडणेकर, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, ता. प्रमुख श्री. रुपेश पिंगुळकर, संघटक श्री. कानू शेळके, म.तालुका प्रमुख अनघा रांगणेकर, जी.प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी, तालुका प्रमुख राकेश नेवाळकर उपस्थित होते.
सोबत शिवसेनेचे मा. संजयजी पडते , स्वरूप वाळके, जयदीप तुळसकर, अरविंद करलकर, भोगटे, अनिकेत तेंडोलकर ही उपस्थित होते. यावेळी सर्व स्टालधारक महिलांचं कौतुक करून त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे मां.श्री. श्रीधर पेडणेकर यांनी सांगितले.