मालवण तारकर्ली येथे कामगाराची आत्महत्या

गळफास घेऊन संपवले जीवन

मालवण: तारकर्ली येथील शासकीय पर्यटन संस्थेत कामासाठी आलेल्या एका कामगाराने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्तमश मोहम्मद अली (वय ३१, रा. उत्तर प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. या घटनेबाबत मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी माहिती दिली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण काय आहे, याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत आणि आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरू आहे. अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!