सावंतवाडी शहरात गोमांस जप्त, मोठी कारवाई सुरू

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या बाहेरचावाडा परिसरात एका घरात गोमांस असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

घटनेच्या ठिकाणी तपासणी केली असता, घरात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले आहे. गोमांसाचा हा साठा जवळपास ८० ते १०० किलो असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. कारवाई पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे.

या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह पोलिसांचे मोठे पथक बाहेरचावाडा परिसरात उपस्थित आहे. गोमांस जप्त केल्याच्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच गोरक्षक, बजरंग दल आणि विहींपच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गोमांसाच्या अवैध साठ्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

error: Content is protected !!