गायक विश्वजित बोरवणकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा
मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान
कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती ५० व्या जिल्हास्तरिय भजन स्पर्धेत यंदा पाट पंचक्रोशीतील रामकृष्णहरि भजन सेवा संघाने बाजी मारली. या भजनी मंडळींनी प्रथम पारितोषिकासह रोख रुपये ५० हजार, कायमस्वरूपी चषक मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या शानदार सोहळ्यात स्वीकारला.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती जिल्हास्तरिय भजन स्पर्धेच यंदाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. त्यानिमित्ताने यंदा हि स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. श्री देव कुडाळेश्वर मंदिरात नवरात्रीपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. सोमवारी कोजागिरी पोर्णिमेचं औचित्य साधून या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सारेगमा फेम महागायक विश्वजित बोरवणकर, राजू पाटणकर, शेखर नाईक, अभिषेक गावडे, ओंकार देसाई,संतोष मालवणकर, किशोर काणेकर, उपस्थित होते.
या भजन स्पर्धेचा पहिला क्रमांक रामकृष्णहरि भजन सेवा संघ,पाट पंचक्रोशी यांनी पटकावला. त्यांना कै प्रकाश पाटणकर यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाटणकर बंधू कडून रोख रुपये ५० हजार आणि चषक, द्वितीय क्रमांक श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी याना श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्याकडून रोख रुपये ३० हजार आणि चषक, तृतीय क्रमांक स्वरब्रम्ह भजन मंडळ, जामसांडे देवगड याना कै मंदार कुळकर्णी स्मरणार्थ रोख रुपये २० हजार आणि चषक , चतुर्थ क्रमांक दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी याना भास्करराव कोर्लेकर, मुंबई यांच्याकडून रोख रुपये १० हजार आणि चषक, पाचवा क्रमांक – सदगुरू प्रासादिक भजन मंडळ,अणसुर पाल यांना श्री एन्टरप्रायजेस, कुडाळ यांच्याकडून रोख रुपये ५ हजार आणि चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्व कायमस्वरूपी चषक कै काशिनाथ रामचंद्र मालवणकर यांच्या स्मरणार्थ संतोष मालवणकर यांनी प्रायोजित केले होते.
त्याशिवाय वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ट गायक हर्षद ढवळ.रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, घोटगे, उत्कृष्ट हार्मोनियम वादक – विकास नर दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडी, उत्कृष्ट पखवाज वादक – प्रथमेश उमेश राणे, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, उत्कृष्ट तबला वादक – अभिनव उदय जोशी, स्वरब्रम्ह भजन मंडळ, जामसांडे देवगड, उत्तेजनार्थ झाँज वादक – आर्यन आईर चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ, सुरंगपाणी वेंगुर्ला यांना प्रत्येकी रोख रुपये २ हजार ५०० मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित महागायक विश्वजित बोरवणकर यांनी शुभेच्छा दिल्या. हि स्पर्धा ५० वर्ष सुरु आहे ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल या मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे विश्वजित बोरवणकर यांनी सांगितले.
यावेळी महागायक विश्वजित बोरवणकर यांचा सत्कार करण्यात आलं. यावेळी सदासेन सावंत, विजय देसाई, संजय पिंगुळकर, रणजित देसाई, गजानन कांदळगावकर, राजू राऊळ, सागर पाटील, हेमंत शिरसाट, विलास राणे, हरेश घुर्ये, राजू सावंत-प्रभावळकर गणपत आळवे, आपा महाडिक उपस्थितहोते. या उपस्थितांचे स्वागत आणि सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हि स्पर्धा पार पाडण्यासाठी गेली ५० वर्ष सातत्याने मेहनत घेणारे बाळू कुडाळकर, सुरेश राऊळ, नंदू कुंटे, श्रीकृष्ण कुंटे, बाबू काणेकर यांना विश्वजित बोरवणकर यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. यावेळी सुशांत राऊळ, निलेश कुडाळकर, यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळू कुडाळकर आणि केदार राऊळ यांनी केलं. या कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.














 
	

 Subscribe
Subscribe









