दोन वाहने जप्त; दोघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल
सावंतवाडी : राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक सिंधुदुर्ग यांच्याकडून सावंतवाडीत मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन चारचाकी वाहने व गोवा बनावटी मद्याचे ४५ बॉक्स जप्त करण्यात आले. याची एकूण किंमत १६ लाख २९ हजार रुपये इतकी आहे. गांधी सप्ताहानिमित्त दारूबंदी कायद्याअंतर्गत छापेमारी मोहीम व वाहन तपासणी सुरू असताना ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
भरारी पथकाने दोन पंच व स्टाफसह सावंतवाडी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या वेळी हुंडाई कंपनीची सिल्व्हर रंगाची सेंट्रो झिंग (क्र. एम एच १५ बी एक्स १५८०) आणि काळ्या रंगाची जीप (क्र. जीए ०३ – वाय १३६३) ही वाहने तपासली असता, त्यातून विविध बॅन्डचे गोवा बनावटी मद्याचे बॉक्स आढळून आले. मद्याची किंमत रु. ४ लाख २९ हजार तर दोन्ही वाहनांची किंमत रु. १२ लाख असून एकूण १६ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दत्तात्रय भिमराव बंडगर (वय ५०, रा. सांगली) आणि गजानन दिनकर पाटील (वय ४९, रा. कोल्हापूर) या दोघांवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. ए. जाधव आणि दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारवाईत व्ही. एन. कदम, जी. एल. राणे, एस. एम. पाटील, पी. व्ही. भोसले, आर. आर. जानकर, के. टी. पाटील, आर. व्ही. शेटगे जवान तसेच निरीक्षक आर. गुरव, दुय्यम निरीक्षक एस. पाटील (विटा) आणि टीमने केले. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एन. पाटील करीत असून या पुढेही अश्या कारवाई सुरू राहणार असण्याचे सांगण्यात आले.














 
	

 Subscribe
Subscribe









