देवगडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

​देवगड: देवगड तालुक्यातील एका गावामधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने देवगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवार, १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपासून ते गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे. फिर्यादी आईने दिलेल्या तक्रारीनुसार देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे या करत आहेत. पोलिसांनी लवकरच संशयिताचा शोध घेतला जाईल आणि त्याला ताब्यात घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!