आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले
मृतांची एकुण संख्या- 5
2 पर्यटक अद्यापही बेपत्ता
सिंधुदुर्गनगरी : काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा – वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले होते. यातील 3 पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) श्रीमती. इसरा इमरान कित्तूर, वय 17 रा. लोढा, बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले होते.
तीन मयत पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे
- श्रीम. नहिदा फरीन इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
- श्री. इबाद इरफान कित्तूर , वय 13, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
- श्रीमती नमीरा अफताब अख्तार, वय 16, रा. अल्लावर, बेळगाव (मयत)
बेपत्ता पर्यटकांची शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध माहिमेत 4 ऑक्टोंबर रोजी पुढील 2 पर्यटकांचे मृतदेह शोध व बचाव पथकास मिळालेले आहेत.
- श्री. इकवान इमरान कित्तूर, वय 15, रा. लोढा, बेळगाव (मयत)
- श्री. फरहान मोहम्मद मणियार, वय 20 रा. कुडाळ, सिंधुदुर्ग (मयत)
उर्वरित बेपत्ता पर्यकांची नावे पुढीलप्रमाणे
- श्री. इरफान मोहम्मद इसाक, कित्तूर, वय 36, रा. लोंढा, बेळगाव
- श्री. जाकीर निसार मणियार,वय 13, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग
घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. शोध व बचाव मोहिमेसाठी कोस्टगार्ड रत्नागिरी यांची मदत देखील घेण्यात येणार आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000000
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










