गो – संवर्धन : ग्रामीण विकासाची नवी दिशा

२६ सप्टेंबर रोजी मोफत गो – संवर्धन कार्यशाळेचे आयोजन

कुडाळ : शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सिंधुदुर्ग, लायन्स क्लब ऑफ कुडाळ आणि गोसेवा गतविधी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक समिती राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गो – संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी गोमाता आणि तिच्या विविध स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व तसेच त्यातून आर्थिक समृद्धी कशी साधता येते यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गो पणती, धूप बत्ती, उटणे, गो काष्ट, गोनाईल (फिनेल) इत्यादी तयार करण्याचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : संकल्प सिद्धी, प्राथमिक शिक्षक पतपेढी, ओरोस

error: Content is protected !!