प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सेवा ही संकल्प, राष्ट्र प्रथम ही प्रेरणा 75 वर्ष निमित्त आज तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत येथे TB- मुक्त भारत,आठवा राष्ट्रीय पोषण महास्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबविण्यात आले यावेळी गावातील महिलांकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली कार्यक्रमाकरिता उपस्थित वैद्यकीय अधिकारी श्री विवेक देशमुख यांनी कार्यक्रमाबद्दलची माहिती दिली तद नंतर श्री रुपेश रवींद्र कानडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सदरील शिबीर कार्यक्रमांस उपस्थितांना सरपंच श्री रामचंद्र परब यांनी शुभेच्छा दिल्या.
सदरील शिबिरामध्ये गावातील 150 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदवला व आपली आरोग्य विषयक तपासणी केली या शिबिरामध्ये त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले व आरोग्य विषयक सल्ला देण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता सरपंच श्री रामचंद्र परब, उपसरपंच सौ धनश्री गवस, ग्राप. सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, श्री अजय डिचोलकर, श्री संतोष डीचोलकर, श्री गुणाजी जाधव, सौ माधवी कानडे, सौ प्रणाली साटेलकर, सौ रोहिणी हळदणकर तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्री रुपेश रवींद्र कानडे, सौ दीप्ती दिवाकर कानडे, सौ अंकिता अंकुश देवळी, सौ रेश्मा रमेश परब, वैद्यकीय अधिकारी श्री विवेक देशमुख, आरोग्य सहाय्यक श्री सुधीर धामणकर, जिल्हा टीबी सुपरवायझर श्री नाईक, आणि सहकारी, आरोग्य सेवक श्री आकाश तायडे, आरोग्य सेविका श्रीमती सुमन पालव, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती अंकिता गावकर, आशा सेविका सौ वैष्णवी बांबर्डेकर, सौ स्मिता मेस्त्री, अंगणवाडी सेविका सौ अंजली कानडे, सौ प्रतिभा डीचोलकर, सौ अनिता जोशी, सौ सुप्रिया धुमक, श्रीमती अस्मिता साळगावकर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी शुभम कानडे, डेटा ऑपरेटर छाया डिचोलकर, ग्रामपंचायत शिपाई निलेश सडेकर, ग्रामस्थ उपस्थित होते…














 
	

 Subscribe
Subscribe









