मालवण धुरीवाडा येथे मटका जुगारावर धाड

कोल्ड्रिंक हाऊसमध्ये सुरू होता मटका जुगार

मालवण : शहरातील बोर्डिंग ग्राऊंड येथील एका कोल्ड्रिंक हाऊसमध्ये ऑनलाईन मोबाईलवर मटका जुगार घेत असताना मालवण पोलिसांनी धाड टाकून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या कारवाईत संशयिताकडून तब्बल ३१ हजार ५७० किमतीचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई काल रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

या कारवाईत दिनकर दाजी खोबरेकर (वय ५१, रा. धुरीवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोबरेकर हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोबाईलवर ऑनलाईन मटका जुगाराचे आकडे घेत होता आणि पैसे प्रत्यक्ष व बँकेच्या स्कॅनरद्वारे स्वीकारत असतानाच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी खोबरेकर याच्याकडून एक मोबाईल, एक प्रिंटर, रोख रक्कम, बँकेचा एक स्कॅनर आणि आकडेमोड करण्यात आलेल्या पावत्या असा एकूण ३१ हजार ५७० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपअधीक्षक नयोमी साटम, विभागीय पोलीस अधिकारी श्री. आव्हाड आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक गणेश माने, जितेंद्र पेडणेकर, सुशांत पवार, महादेव घागरे, गुरुनाथ परब, मनोज कांबळे या पोलिस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस हवालदार जे. एस. कुडाळकर करत आहेत.

error: Content is protected !!