सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर लोगो अनावरण व शतक महोत्सवाचा शुभारंभ

राजापूर : राजापूर शहरातील एकमेव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ९९ वर्ष पूर्ण होऊन या मंडळाने १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे.या मंडळाचे २०२४-२५ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असणार आहे.राजापूर शहराचा एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव म्हणून ख्यातनाम असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १९२६ साली झाली या मंडळाला २०२५ साली १०० वर्ष पूर्ण होणार आहेत यानिमित्त २०२४-२५ हे शताब्दी महोत्सवी वर्ष असणार आहे २०२५ साली साजरा होणारा गणेशोत्सव हा उत्सव शतक महोत्सवी उत्सव असणार आहे.या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूर यांचे वतीने विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.शतकमहोत्सवासाठी मंडळाचा विशेष लोगो तयार करण्यात आला आहे त्याचे अनावरण/ लोकार्पण व शतक महोत्सवाचा शुभारंभ कार्यक्रम मंगळवार दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी समर्थनगर येथील श्रीदेव मारूती मंदिर,थर्मशाळा येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे यावेळी जेष्ठ गणेशभक्तांच्या हस्ते लोगोचे अनावरण व लोकार्पण केले जाणार आहे यावेळी बडोदा येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संकेत भोळे यांचे सार्वजनिक गणेशोत्सवाची गरज व उद्देश याविषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे तरी सर्व राजापूरकर गणेश भक्तांनी वरील दोन्ही कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजापूरचे अध्यक्ष श्री मधुकर शंकर देवरूखकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *