कुडाळ : शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी कुडाळ तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर भेट देत मतदानाचा आढावा घेतला.
कुडाळ – मालवण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जिल्ह्यात महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून येऊन इतिहास रचतील असे त्यांनी यावेळी सांगितले.