यावर्षीच्या पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर मंदिरातील पहिला पूजेचा मान श्री आनंद शिरवलकर यांना

कुडाळ : प्रतिवर्षीप्रमाणे श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहिली पूजा संपन्न होत असून या पहिल्या पूजेचा पहिला मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे.

आनंद शिरवलकर हे शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत असून अनेक सामाजिक कार्यात देखील ते नेहमी अग्रेसर असतात.

श्री देव कुणकेश्वर मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवार निमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते पूजा संपन्न केली जाते. यावर्षी देखील दिनांक २८ जुलै, ४ ऑगस्ट, ११ ऑगस्ट व १८ ऑगस्ट रोजी पूजा संपन्न होत आहे. यावर्षी २८ जुलै रोजी पहिल्या श्रावणी सोमवारी संपन्न होणाऱ्या पूजेचा मान उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे.

error: Content is protected !!