अखेर धोकादायक वळणावरील वाढलेली झाडी तत्काळ साफ केली

युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांच्या मागणी यश

कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले होते. प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली होती. प्रशासनाने यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ठाकरे गटाचे युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी केली होती.

कुडाळ वेंगुर्ला मार्गावर सिंधुदुर्ग पॅलेस या ठिकाणी धोकादायक वळणावर झाड पडले होते. क्या घटनेला तीन दिवस उलटून देखील प्रशासनाने योग्य ती कारवाई केलेली नाही. शिवाय पिंगुळी तिठा – नेरूर या मार्गावरील धोकादायक वळणांवर झाडे आणि वेलींचे प्रमाण वाढले होते या दोन्ही मार्गांवर वाहनांची नेहमी वर्दळ असल्यामुळे वाहनचालकांच्या जीवितास यामुळे धोका निर्माण होनार होता. त्यामुळे लवकरात लवकर त्या मार्गांवरील झाडी स्वच्छ करावी अशी मागणी युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी केली होती.
प्रशासनाने युवा सेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांच्या मागणीकडे लक्ष देत आज ही कामे पूर्णत्वास नेली ग्रामस्थांनी केतन शिरोडकर यांचे आभार मानले.

error: Content is protected !!