Category बातम्या

कोलगाव ओहोळात आढळली भलीमोठी मगर

सावंतवाडी : येथील मोती तलावातील असणारी मगर पकडून अन्य ठिकाणी सोडलेली घटना ताजी असताना कोलगाव आयटीआय परिसरात असलेल्या ओहोळामध्ये भली मोठी मगर आज दिसून आली आहे. तेथील स्थानिक युवक परेश बावकर व त्यांच्या सहकाऱ्यांना ही मगर दिसली. त्यांनी ती आपल्या…

भोंगा वाजला..आणि गुन्हा दाखलझाला

कुडाळ : कुडाळ येथील मशिदीवर अजान चालू ठेवून दिलेल्या ध्वनीक्षेपक परवानग्याच्या अटी, शर्तींचे भंग केल्याप्रकरणी पान बाजार येथील हुसेन जैनुद्दीन मुजावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार दयानंद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये असे…

चक्क डॉक्टरला ७ लाखांचा गंडा ….

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : येथील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी…

सिताराम संजीवनी आश्रमास सारा ॲग्रोटेक कडावल यांच्याकडून ग्रास कटर भेट

युवा उद्योजक संकेत सुनिल सावंत यांचा स्तुत्य कार्य सिताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्याकडून समाधान व्यक्त कुडाळ : सारा ॲग्रोटेक कडावल यांच्याकडून सिताराम संजीवनी आश्रमास आज ग्रास कटर आणि गार्डन टूल भेट देण्यात आले. यावेळी सीताराम संजीवनी आश्रमाच्या…

बसने प्रवास करतेवेळी इसमाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : खासगी बस मधून प्रवास करत असताना अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. मेलरॉय हे…

माडखोल येथे कारला अपघात

दोन दुचाकींना चिरडले बाळूमामा दर्शन आटपून तळवडे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना चिरडले. ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्याने घडली यावेळी तेथे बससाठी उभे असलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली.…

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 22 सप्टेंबर रोजी

प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी रात्रौ 07.00 वाजता श्री. देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती सुवर्ण महोत्सवी वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय भजन स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 50 मृदंगांच्या नादब्रम्हामध्ये आकर्षक, नेत्रदिपक भव्य असा…

नवरात्रोत्सवानिमित्त कवठी येथे भव्य भजन स्पर्धा!

कुडाळ : कवठी येथील श्री सातेरी भजनप्रेमी कलामंच आणि ग्रामस्थ यांनी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २०२५ चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २६ ते २९ सप्टेंबर २०२५ या काळात श्री सातेरी मंदिर, कवठी येथे होणार आहे. स्पर्धेतील बक्षिसे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी गोंधयाळेचा (मराठी माध्यम)माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

कुडाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंगुळी गोंधयाळे (मराठी माध्यम) माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २०२५शाळेच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा आज शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या मेळाव्यात बालपणातील गोड आठवणी शिकवणीचे संस्कार आणि आजचे जीवनमूल्य यावर आठवणींचा सुंदर ठेवा रंगला.शाळेच्या…

पर्यावरण संतुलनासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा; स्वच्छ किनाऱ्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा– जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी : प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स यांसारखा कचरा विघटन न होणारा असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक वापर शून्यावर आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे…

error: Content is protected !!