कल्पकतेला पराकोटीचा प्रतिसाद देऊन दूरदृष्टी ठेवणारा नेता

डिगस तलाव परिसर बनणार पर्यटन केंद्र

जवळपास तीन वर्षांपूर्वी डिगस चोरगेवाडी तलावात जलपर्यटन उपक्रम सुरु करताना तलाव परिसर सुशोभिकरण करून एक उत्कृष्ट दर्जाचे पर्यटन केंद्र बनवण्याचा डोक्यात विचार आला होता. गेल्यावर्षी माझे सहकारी मित्र योगेश घाडी व निखिल कांदळगांवकर यांच्यासोबत या संदर्भात प्राथमिक चर्चा करून मा.निलेशजी राणे साहेबांच्या समोर प्रकल्पाचे सादरीकरण करून परिपूर्ण प्रस्ताव दिला.(निलेश साहेब तेव्हा आमदार नव्हते ) मात्र निलेश साहेबांनी चांगली कल्पना असून डिगस धरणाचा आपण कायापालट करून उच्च दर्जाचे पर्यटन केंद्र बनवू असा शब्द त्यावेळी दिला होता. विशेष म्हणजे डिगस गावचे सुपुत्र निखिल कांदळगावकर यांनी निलेश साहेब आमदार झाल्यानंतर याबाबत पाठपुरावा केल्याने आमदार साहेबांनी अडीज कोटी रुपये डिगस तलाव परिसर सुशोभीकरणासाठी शासनाकडून प्रादेशिक पर्यटन घटकाखाली मंजूर करून घेतले. या निमित्ताने मागील कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिलेले डिगस तलाव जिल्ह्यात एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून विकसित होवून नावारूपास येणार आहे ते फक्त आमदार मा. निलेशजी राणे साहेबांमुळेच…! बरं हे पर्यटन केंद्र नुसतं डिगस गावासाठी ओळख ठरणार नसून संपूर्ण पंचक्रोशीसाठी भूषणावह ठरणारे आहे. शिवाय या निमित्ताने स्थानिकांना छोट्या मोठ्या रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. कार्यकर्त्यांच्या कल्पनेला पराकोटीचा प्रतिसाद देत दूरदृष्टी ठेवून विकसित जिल्ह्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या माननीय आमदार निलेशजी राणे साहेबांचे या निमित्ताने मनापासून अभिनंदन व आभार..!

-प्रसाद गावडे
जिल्हाध्यक्ष, शिवसेना कामगार सेना

error: Content is protected !!