गाडीचा दरवाजा लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद

युवकाच्या डोक्यावर डस्टबिन मारून केले जखमी

दोघांवर गुन्हा दाखल

सावंतवाडी : गाडीचा दरवाजा लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी मिळून एका युवकाच्या डोक्यात डस्टबिन मारून गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल मँगो परिसरातील एका कॅफेसमोर घडली. याबाबत मौहसीन शब्बीर तांबोळी (रा. कोलगाव दरवाजा, वैश्यवाडा, सावंतवाडी) यांनी फिर्याद दिली असून ओंकार गावकर व सोहेल मुजावर (दोघेही रा. सावंतवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, फिर्यादी तांबोळी हे आपल्या कॅफेजवळ थांबलेले असताना दोघे संशयित तेथे आले. ते गाडीचा दरवाजा उघडत असताना दरवाजा तांबोळी यांच्या अंगाला लागला. त्याबाबत त्यांनी चौकशी केली असता संशयितांनी उलट वाद घालून संतप्त होऊन डस्टबिनच्या डब्याने तांबोळी यांच्या डोक्यावर प्रहार केला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

या घटनेनंतर रात्री उशिरा तांबोळी यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेश जाधव करत आहेत.

error: Content is protected !!