अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचा यावर्षी 5 पट अधिक बोनस मिळविण्याचा मानस
कुडाळ : चेंदवण स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी डेअरी संस्थेचा सन 2024-25 वर्षातील रू 18 हजार बोनस अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे उपस्थित चेंदवण येथे वाटप करण्यात आला.यावेळी दुध डेअरीला नियमित दूध पुरवठा करणा-या ग्राहकांना स्टीलची किटली भेटवस्तूरूपात वितरित करण्यात आली व यावर्षी संस्थेचा बोनस 5 पटीने मिळविण्याचा मानस अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी व्यक्त केला.यावेळी संस्थेचे सचिव श्री सत्यवान परब उपस्थित होते. चेंदवण च्या माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे संकल्पनेतून चेंदवण कवठी भागातील शेतक-यांना दुग्ध व्यवसायातून कौटुंबिक उन्नती होण्याच्या दृष्टीने स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था चेंदवण या दुध डेअरी संस्था गेल्या काही वर्षांत स्थापन करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात शेतक-यांनी केलेली प्रगतीच्या धरतीवर चेंदवण मधील शेतकऱ्यांनाही स्वतःच्या कुटुंबाची उन्नती करावी यासाठी पारंपरिक दुग्ध उत्पादक जनावरांमध्ये विविध आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांना करता यावे यासाठी या संस्थेच्या अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक नेहमी कार्यरत असतात. संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बोनस वाटप व किटली वस्तू वाटप कार्यक्रमावेळी अध्यक्षा सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी दुध उत्पादन व दूध उत्पादक वाढवण्याच्या दृष्टीने स्वयंभू दुग्ध व्यावसायिक सहकारी दुध डेअरी संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील व यासाठी विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा देता येईल व यावर्षी दूध डेअरीचा बोनस 5 पटीने मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.


Subscribe










