कोलगाव येथे अपघात

मद्यधुंद कारचालकाची दुचाकीला धडक

दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत

कोलगाव : कोलगाव येथे आज दुपारच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका चालकाने कार चालविताना दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर प्रवास करत असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ वकील अॅड. बापू गव्हाणकर यांनी तत्काळ मदतकार्य करत आपल्या कारमधून जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार सुरू होऊ शकले.

दारूच्या नशेत असलेल्या चालकाकडून ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संतप्त ग्रामस्थांनी संबंधित कार जप्त करत पोलिसांना पाचारण केले आहे. अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

error: Content is protected !!