पिरंदवणे : संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ येथे आज गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन उत्साहात संपन्न झाला.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेस अभिवादन केले. आपल्या मार्गदर्शनातून चाचा नेहरू व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेले दृढ नाते त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर चाचा नेहरूंचे नवभारतासाठीचे योगदान विद्यार्थ्यांना विविध उपक्रम राबवून स्पष्ट करण्यात आले.