दादा साईल व निखिल कांदळगावकर यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल आणि निखिल कांदळगावकर यांचा जोरदार प्रचार सुरू असून, प्रचाराने वेग घेतला आहे. जि.प.चे उमेदवार दादा साईल आणि डिगस पं.स.चे उमेदवार निखिल कांदळगावकर यांनी थेट जनसंवादावर भर दिला असून, मतदारसंघाच्या विकासाचा वचननामा मतदारांपर्यंत पोचवला जात आहे.

साईल आणि कांदळगावकर यांनी पणदूर, अणाव, हुमरमळा, डिगस या गावांत झंझावाती प्रचार फेरी काढत ग्रामस्थ व मतदारांशी संवाद साधला. त्या सोबतच साईल यांनी जि.प. मतदारसंघातील पावशी, बांव, बांबुळी, सोनवडे आदी सर्वच गावात प्रचार फेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेत विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडला. आमच्या प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनता निश्चितच महायुतीच्या बाजूने ठामपणे उभी राहील असा विश्वास श्री.साईल आणि श्री.कांदळगावकर यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या वतीने मतदारसंघात वचनामा घराघरांत पोचवला जात आहे. सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभाराची हमी देण्यात आली आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारणार, पाणीपुरवठा व स्वच्छता यात अव्वल दर्जा राखणार, कृषीविकासातून शेतकऱ्यांना सन्मान देणार, महिला व बालकल्याण यासाठी कटीबद्ध, रोजगार व कौशल्य विकास यातून युवा परिवर्तन, रस्ते व पायाभूत सुविधा निर्मिती, असे वचननाम्यात नमूद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!