सौंदळ रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याचे उंचीकरण रुंदीकरण आणि मजबुद्धीकरण करावे

सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांची मागणी

राजापूर : शहराकडून शीळ,गोठणे दोनिवडे, चिखलगाव सौंदळ रेल्वे स्टेशनकडे तसेच पाचल कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण,उंचीकरण मजबुतीकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कनिष्ठ अभियंता देसाई व बावधनकर यांच्याकडे सुपूर्त केले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, राजापूरकडून शिळ, गोठणे दोनिवडे, चिखलगांव, सौंदळ रेल्वे स्टेशन, रायपाटण, पाचल कोल्हापूरकडे जाणारा प्रमुख मार्ग असून या ठिकाणाहून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच या मार्गावर सौंदळ रेल्वे स्टेशन हे राजापूर शहरासाठी तसेच संपूर्ण पंचकोशीतील गावासाठी एक जवळचे रेल्वे स्टेशन असल्याने रेल्वेच्या प्रवासासाठी जाणा-या व येणा-या गावातील, या विभागातील तसेच मुंबई, रत्नागिरी, गोव्याकडे जाणा-या गावकरी व व मुंबईकर मंडळीची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच हा प्रमुख रस्ता अर्जुना नदी लगत असल्याने पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी सखल भागांत रस्त्यावर असते. त्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद अवस्थेत असतो. त्यामुळे सखल असलेल्या राजापूर मोठ्या ब्रिजच्या नजीक पावसकरवाडी, शिळ गांगोमंदीर ब्रिज जवळ, गोठणे, दोनिवडे येथील साखरकर आणि खलिफे घराच्या नजदिक, चिखलगांव बादयाचा माळ, व पाजवे वाडी नजदिक सखल भाग असल्याने या ठिकाणी पूराच्या पाण्यामुळे रस्ता बंद पडल्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. या भागांतील येण्याजाण्यासाठी जनतेचे प्रचंड हाल होत असतात. त्यामुळे या कारणांस्तव येथील रस्त्यांचे उंचीकरण करण्यात अत्यंत आवश्यक आहे. तसेच संपूर्ण बाबीचा विचार करुन. तात्काळ या रस्ता रुंदीकरण उंचीकरण, मजबूतीकरण करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!