दोडामार्ग : जर्मनीत चार लाख युवकांना रोजगाराच्या संधी आहेत. त्यांना भारतापेक्षा अधिक पगार मिळणार आहे. त्यांची व्हिजासह सर्व व्यवस्था सरकार करणार आहे. जीवन सुखी पाहिजे तर क्रांती करायला हवी. महायुतीला बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत. या निडणुकीमध्ये मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री व महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी मतदारांना केले.
त्यांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर, पिकुळे , शिरंगे, कोनाळकट्टा, हेवाळे, घोडगेवाडी, मोर्ले, साटेली- भेडशी येथे खळा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांनी त्यांच्याशी संवाद साधला. बैठकीला शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, युवा तालुका प्रमुख भगवान गवस, भाजपचे गोवा प्रभारी दत्ता नाईक रेडकर, भाजपचे उपजिल्हा अध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजप तालुका उपाध्यक्ष सुधीर दळवी, उपाध्यक्ष अनंत तळणकर, शिवसेना युवा तालुका प्रमुख भगवान गवस, महिला तालुका प्रमुख चेतना गावडे, सानवी गवस, राष्ट्रवादी तालुका प्रमुख सत्यवान गवस, आरपीआयचे रामदास कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.