समोर कितीही मोठी शक्ती असली तरी भगवाच फडकेल

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील जनता निष्ठावंताच्या पाठीशी राहील

कणकवली : कळसुली जिल्हा परिषद मतदार संघातील
जनतेची साथ आमच्या सोबत आहे. निवडणूक लढवताना समोर कितीही मोठी शक्ती असली, तरी आम्ही डगमगणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकूनही येऊ. निष्ठावंत शिवसैनिकांची एकजूट आणि सामान्य जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे.असा विश्वास ठाकरे सेनेचे कळसुली पंचायत समितीचे उमेदवार श्री.मनोहर मालंडकर यांनी व्यक्त केला.

ते हळवल येथे निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते.यावेळी
शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू राणे,हळवल माजी सरपंच रवि परब, माजी सरपंच दिपक गुरव, , ग्रामपंचायत सदस्य अनंत राणे, रोहित राणे, प्रभाकर चव्हाण,भाऊ तांबे,दिलीप परब,आप्पा ठाकुर, सुभाष परब, निलेश ठाकुर, सुधाकर राणे, महेश कदम, संतोष गुरव, सिताराम गुरव,विजय घावनळकर ,व्हि.एस.सोनु‌ सावंत, प्रमोद गावकर,सखाराम गावकर, गणेश राणे, सुभाष राणे,
पपू परब यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना मालंडकर म्हणाले की,आम्हाला वागदे , कळसुली, शिरवल, हळवल, कसवण- तळवडे , ओसरगाव बोर्डवे या गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर जनतेचाही आम्हाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.कळसुली जिल्हा परिषदेसह कळसुली आणि ओसरगाव या दोन्ही पंचायत समितीवर ठाकरे शिवसेनेचा भगवा निश्चितपणे फडकेल,असा विश्वास मालंडकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!