विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
योगिता कानडे/कुडाळ: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निघालेल्या स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ शहरात आगमन होत आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ चे कार्यक्रम:
सायंकाळी ५.०० वा: श्री स्वामी समर्थ मंदिर, नाबरवाडी, कुडाळ येथे पालखीचे आगमन.
सायंकाळी ५.१० वा: नाबरवाडी मंदिर ते बाजारपेठमार्गे महालक्ष्मी हॉलपर्यंत भव्य मिरवणूक.
रात्री ८.०० वा: श्री. विनायक वामन केसरकर (पावशी) यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन.
रात्री ८.०० वा: पालखी व पादुकांची षोडशोपचारे पूजा आणि महाआरती.
रात्री ८.३० वा: तीर्थप्रसाद व महाप्रसादास सुरुवात.
रात्री ९.०० वा: सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम.
शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ चे कार्यक्रम:
सकाळी ५.०० वा: अभिषेक व काकड आरती.
सकाळी ९.०० वा: पालखी व पादुका पुढील परिक्रमेसाठी मार्गस्थ होतील.
स्थळ : श्री. विनायक वामन केसरकर, मु. पो. पावशी, ता. कुडाळ.
संपर्क : ९४२३३०४१७१ / ९४२१३०४१७१
आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांना पालखी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Subscribe









