राजापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. धोपेश्वर पंचायत समिती गणातून इच्छुकांच्या यादीमध्ये शिवसेनेकडून सामाजिक कार्यकर्ते व कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
राजापूर शहरालगत असल्याने धोपेश्वर पंचायत समिती गणाकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. सद्यस्थितीत या पंचायत समिती गणातून शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असली तरी लांजेकर यांच्या नावाला नागरीकांकडून विशेष पसंती मिळत आहे. लांजेकर यांचे सर्व पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तसेच राणे कुटुंबीयांचा, व आमदार निलेश राणे यांचा कट्टर प्रामाणिक कार्यकर्ता व आमदार किरण सामंत यांचा निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे.
राजापूर तालुक्यातील विविध समाजिक, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. तालुक्यात झालेले टोलविरोधी आंदोलन असो, तालुक्यातील मोकाट गुरांचा प्रश्न असो, महामार्गावरील रखडलेली कामे असो, महावितरण च्या माध्यमातून, ग्राहकांचे प्रश्न असो, अशा विविध प्रश्नांमध्ये त्यांनी आवाज उठवून अशी कामे मार्गी लावली आहेत. प्रशासनाशी अत्यंत जवळीक असल्याने सर्व सामान्यांची रखडलेली कामे मार्गी लावण्यात लांजेकर यांचा हातखंडा आहे. कोंढेतड गावातील हमरस्ते, पाण्याचा प्रश्न, स्ट्रीट लाईचा प्रश्न असे प्रश्न त्यांनी सोडविले असून आता धोपेश्वर गणातील धोपेश्वर, गोवळ, शेढे, शीळ, कोदवली, गोठणे दोनिवडे, चिखलगाव या गावांमध्ये प्रत्येक वाडीत स्ट्रीट लाईट बसविण्याचा त्यांचा मानस आहे.
सद्यस्थितीत त्यांनी धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण, सुशोभिकरण, राजापूर-शीळ-चिखलगाव मार्गे सौंदळकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरणाची मागणीही त्यांनी आमदार, पालकमंत्री, खासदार यांच्याकडे केली आहे. कोठेही अपघात झाल्यास तातडीने मदतीला धावून जाणे, निराधार कुटुंबांना आर्थिक आधार मिळवून देणे, तालुक्यातील गोरगरीब जनतेची शासकीय कार्यालयातील छोटी-मोठी कामे मार्गी लावून देणे या करीताही ते तत्काळ हजर असतात. व ती मार्गी लावतात, तालुक्यातील हिंदु-मुस्लीम अशा सर्व धर्मीयांच्या कार्यक्रमात व सुखदुःखात नेहमीच हजर असतात. त्यामुळे या पंचायत समिती गणातून लांजेकर यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.


Subscribe









